पोंभूर्णा तालुक्याच्या विकासाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:21 AM2018-03-15T01:21:53+5:302018-03-15T01:21:53+5:30

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पोंभूर्णा तालुक्याच्या विकास कामांसाठी भरगच्च निधी मिळत आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळत असून येत्या काही दिवसात तालुक्याचा कायापालट होणार, ....

Speed ​​of development of Ponchhurna taluka | पोंभूर्णा तालुक्याच्या विकासाला गती

पोंभूर्णा तालुक्याच्या विकासाला गती

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून भरघोस निधी : विविध रस्ते कामांचा जि. प. अध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ

ऑनलाईन लोकमत
पोंभूर्णा : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पोंभूर्णा तालुक्याच्या विकास कामांसाठी भरगच्च निधी मिळत आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळत असून येत्या काही दिवसात तालुक्याचा कायापालट होणार, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत पोंभूर्णा तालुक्यातील मोहाळा (रै.) येथे सिमेंट काँक्रीट नाली व पेवर्स ब्लॉक बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवराव भोंगळे यांनी चकठाना येथील तीन लाख रुपये रस्त्याचे तसेच आष्टा येथील सात लाख, चक नवेगाव १३ लाखांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्या कामाचे शुभारंभ केले. यावेळी पोंभूर्णाचे नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, जि. प. सदस्य राहुल संतोषवार, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, पं.स. सदस्य गंगाधर मडावी, हरिश ढवस व त्या गावातील पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री आणखी निधी देणार असून प्राथमिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असेही भोंगळे यांनी सांगितले.

Web Title: Speed ​​of development of Ponchhurna taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.