कर्करोग रूग्णालय उभारणीच्या कामांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 10:47 PM2018-12-05T22:47:15+5:302018-12-05T22:47:47+5:30

चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनचे रूग्णालय उभारण्याच्या कामास गती द्यावी. जमीन हस्तांतरण आणि निधीची पूर्तता तातडीने करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिले.

Speed ​​up the work of cancer hospital | कर्करोग रूग्णालय उभारणीच्या कामांना गती द्या

कर्करोग रूग्णालय उभारणीच्या कामांना गती द्या

Next
ठळक मुद्देमुंबईत घेतला आढावा : सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनचे रूग्णालय उभारण्याच्या कामास गती द्यावी. जमीन हस्तांतरण आणि निधीची पूर्तता तातडीने करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिले.
चंद्रपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने टाटा ट्रस्ट सुसज्ज कॅन्सर रूग्णालय उभारत आहे. या संदर्भातील कामांचा आढावा घेण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी ना. मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीस संबंधित डॉक्टर आणि अधिकारी यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांना व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रूग्णालयाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. या बैठकीस फाउंडेशनचे संचालक आशिष देशपांडे आणि राघवन शास्त्री, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, वित्त विभागाचे सचिव मुग्धा धुरी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवाते, टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे संचालक डॉ. आर.ए. बडवे आदी उपस्थित होते.
यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, १२० रूग्णांसाठी खाटांची व्यवस्था असलेले बाह्य रुग्ण विभाग, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह लॅब, सुसज्ज आॅपरेशन थिएटर, रूग्णालातील डॉक्टर, परिचारिका यांच्यासाठी निवासस्थान, असे सुसज्ज रूग्णालय चंद्रपूर येथे टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन उभारणार आहे. अनेक गरजू गरीब रूग्णांना याचा भविष्यात लाभ होणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. हे रूग्णालय उभारण्यासाठीची जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आणि निधी वितरण तातडीने करावे, असेही त्यांनी संबंधितांना सांगितले.

Web Title: Speed ​​up the work of cancer hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.