प्रवेशद्वार सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: October 6, 2015 01:24 AM2015-10-06T01:24:52+5:302015-10-06T01:24:52+5:30

लोकमत सखी मंच राजुराच्या वतीने आयोजित प्रवेशद्वार सजावट स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृतीची

Spontaneous response to the entrance decoration tournament | प्रवेशद्वार सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रवेशद्वार सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

राजुरा : लोकमत सखी मंच राजुराच्या वतीने आयोजित प्रवेशद्वार सजावट स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृतीची जोपासना करणारी ही स्पर्धा सुबक तोरणांनी आणि रांगोळ्यांनी सजली होती. जणू काही दिवाळीचा सण आणि दारावरची तोरणे, रांगोळीचा भास उपस्थितांना होत होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक राधिका ढुमने यांनी पटकाविला. द्वितीय अश्लेषा पाटील, तृतिय मंजुषा गायकवाड, प्रोत्साहनपर साधना रणदिवे, नैना गेडाम, विणा देशकर, साधना मड्डम, चंदा ओझा, भावना खाडे यांनी पटकाविला. ‘वन मिनीट शो’ मध्ये वंदना खेडेकर, संध्या बाभुळकर, अश्विनी रामने, माधुरी चौधरी, राधा ढुमने, निर्मला कोंडलकर सहभागी झाले. सर्व विजेत्या स्पर्धकांना कार्यक्रमाचे अतिथी भारती विजयकर, संध्या मुंधडा, रंभा गोठी, आशा लांडे, वैशाली सुर, संध्या पत्तेवार, रिता पाटील, प्रा. सुनिता जमदाडे यांच्या हस्ते भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी अश्लेषा पाटील यांनी नृत्य सादर केले. स्वागतगीत विणा देशकर, शुभांगी वाटेकर यांनी गायन केले. प्रास्ताविक संध्या पत्ेवार यांनी केले. संचालन शहर संयोजिका कृतिका सोनटक्के यांनी केले. आभार रिता पाटील यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्मिता येरावार, सुप्रिया पोशट्टीवार, उज्वला चलाख, ज्योती जावरे, माधवी कटकु, अर्चना खाडे, संगीता पाचघरे, वंदना वाटेकर, मंगल वाटेकर, संध्या वानखेडे, विभल कॉन, वर्षा वैद्य, नम्रता खोड, अल्का गंगशेट्टीवार, रजनी भावे, वर्षा कोंडावार, स्वरूपा झंवर, राधिका धनपावडे यांच्यासह सखी मंच सदस्यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Spontaneous response to the entrance decoration tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.