आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:39 PM2018-01-12T23:39:35+5:302018-01-12T23:40:02+5:30

ब्रह्मपुरी महोत्सवाच्या दुसºया दिवशी महिला कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Spontaneous response to the health camp | आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next
ठळक मुद्देब्रह्मपुरी महोत्सव : होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांचा सहभाग

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी महोत्सवाच्या दुसºया दिवशी महिला कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच दिवशी युवकांसाठी आयोजित मोटीवेशनल प्रोग्राम व खास महिलांसाठीच्या होम मिनिस्टरने महोत्सवाला रंगत आली.
पंचशिल वसतिगृहाच्या पटांगणावर आरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्य विभाग नागपूरचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी केले. अध्यक्षस्थानी आ. विजय वडेट्टीवार होते. अतिथी म्हणून आयएमएचे तालुका अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर, डॉ. प्रशांत लोडे, डॉ. शीतल कांबळे, डॉ. प्रितमकुमार खंडाळे उपस्थित होते. मॅमोग्रामीसाठी नागपूरवरून मशिन आणली. शिबिरात ७४० रुग्णांची तपासणी केली. यात २७ रुग्ण कॅन्सरबाधित आढळली. पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे आयोजक आ. वडेट्टीवार यांनी सांगितले. सिंदेवाही, मूल, आरमोरी, पाथरी, नागभीड, वडसा, ब्रह्मपुरी, सावली आदी भागातून रुग्णांनी हजेरी लावली होती. शिबिराची जबाबदारी डॉ. सतीश कावळे, सतीश तुंडूलवार, विरभद्र कोट्टरवार, महेश भर्रे, वखार खान, राकेश पडोळे, अनिल वनकर यांनी पार पाडली. दुसºया सत्रात युथ मोटीवेशनल कार्यक्रमात शेकडो युवकांना स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यावर प्रशांत वावगे, एसडीपीओ प्रशांत परदेसी, डिएफओ कुलराज सिंग यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रा. देवेश कांबळे, होम मिनिस्टरसाठी स्मिता शेवाळे यांच्या उपस्थितीत महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी रेश्मा लाखानी, किरण वडेट्टीवार, रश्मी पेशने, प्रतिभा फुलझेले उपस्थित होते. यावेळी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.

Web Title: Spontaneous response to the health camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.