लोकमत रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:01+5:302021-07-03T04:19:01+5:30
चंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्ताने ‘लोकमत रक्ताचं ...
चंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्ताने ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही रक्तदानाची भव्य मोहीम राज्यभरात हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत शुक्रवारी स्थानिक आयएमए सभागृहात रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, तसेच आरोग्य क्षेत्रातील रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदविला. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारात जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन रेडक्राॅस सोसायटी, तसेच सोमय्या पाॅलिटेक्निक चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने रक्तदानाच्या या महायज्ञाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर जोरगेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, आयएमएचे अध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजकुमार गहलोत, रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अनंत हजारे, आयएमएचचे सचिव डाॅ. अनुप पालिवाल, लघु न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उपसंचालक डाॅ. मनोज भांडारकर, लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डाॅ. अशोक बोथरा, माजी नगरसेवक, तसेच जलबिरादरीचे संयोजक संजय वैद्य, लोकमत विक्रेते रमन बोथरा, ‘लोकमत’चे शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी अरुणकुमार सहाय, आदींची यावेळी उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. चंद्रपूर जिल्हा सामाजिक भान असलेला जिल्हा आहे. सामाजिक कार्यात नागरिक प्रत्येक कामात अग्रेसर आहे. लोकमत वेळोवेळी लोकोपयोगी उपक्रम राबवीत असून, चांगल्या कामाची नेहमी दखल घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आयएमएचे अध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे यांनी चांगल्या कामासाठी आपण एकत्र आलो आहे. कोरोना काळात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यात प्रत्येकांनी हातभार लावण्याचे आवाहन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड म्हणाले, कोरोना काळात ‘लोकमत’ने हाती घेतलेला उपक्रम सामाजिक हिताचा असून, ‘लोकमत’ने राज्यभर रक्तदान शिबिर आयोजित करून नवा आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत म्हणाले, ‘लोकमत’ने लोकहितासाठी रक्तदान शिबिराची चळवळ हातात घेतली आहे. देशसेवेसाठी प्रत्येकांनी रक्तदान केलेच पाहिजे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी ‘लोकमत’ने राज्यात रक्ताची गरज लक्षात घेत सामाजिक उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे गरजूंना त्वरित रक्त मिळणार असून, रुग्णांचा जीव वाचणार असल्याचे सांगितले.
लोकमत शाखा व्यवस्थापक विनोद बुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर यांनी प्रास्ताविक केले, तर सोनम मडावी यांनी आभार मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अनंत हजारे, डाॅ. कीर्ती साने, डाॅ. अंकुश खिचडे, संजय गावीत, वर्षा देशमुख, अमोल जिद्देवार, प्रसाद शेटे, योगेश जारुंडे, अपर्णा रामटेके, आनंद चव्हाण, अरविंद बक्सरीया, सुखदेव चांदेकर, चेतन वैरागडे, साहिल भसारकर, आदींनी सहकार्य केले.
बाॅक्स
राजेंद्र उत्तरवार यांचा उत्साह
दुर्गापूर येथील शेतकरी, तसेच किराणा व्यावसायिक राजेंद्र शंकरराव उत्तरवार यांनी आजपर्यंत १५ वेळा रक्तदान केले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ते त्याच उत्साहाने रक्तदानासाठी केंद्रावर पोहोचले. मात्र, त्यांचे वय ६९ वर्षांवर होत असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. त्यांच्यातील उत्साह बघून रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. अनंत हजारे यांनी त्यांचा प्रमाणपत्र, तसेच एक वृक्ष देऊन सत्कार केला. यामुळे ते भारावले.
---
यांनी घेतला सहभाग
इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर
इको-प्रो संस्था
श्रीराम सेवामंडळ, रामनगर
विठाई बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर
सखी मंच, चंद्रपूर
स्टेडियम मित्र परिवार
---
रक्तदात्यांचा सत्कार
जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्लड बँकेच्या वतीने रक्तदाते, तसेच रक्तदान शिबिर आयोजन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, काही रक्तदाते उपस्थित नसल्याने यावेळी उर्वरित रक्तदाते, तसेच संस्थांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
-
रक्तपेटी कर्मचाऱ्यांचाही सत्कार
रुग्णांना गरज भासली तेव्हा रक्तसंकलन, तसेच पुरवठा करण्याचे काम रक्तपेढीतील कर्मचारी करतात. त्यामुळे या कार्याची दखल घेत लोकमत परिवार, तसेच रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार केला.
शतकवीर रक्तदाते
चंद्रपूर येथील हितेश पात्रीकर यांनी आजपर्यंत तब्बल ११५ वेळा रक्तदान केले. या शिबिरातही त्यांनी रक्तदान करून नवा आदर्श निर्माण केला. त्यासोबतच माजी नगरसेवक, जलबिरादरीचे संयोजक संजय वैद्य यांनी आजपर्यंत १०८ वेळा रक्तदान केले. विशेष म्हणजे, ‘लोकमत’च्या प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये त्यांनी रक्तदान केले आहे. त्यानंतर रूपेश ताजणे यांनी ९१ वेळा, तर विठाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर यांनी ८१, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय यांनी ७८ वेळा, राजेश वनकर यांनी ६९, नटराज डान्स क्लासचे अब्दुल जावेद यांनी ३१, तसेच अन्य रक्तदात्यांनीही वेळोवेळी रक्तदान करून अनेकांचा जीव वाचविला आहे. विशेष म्हणजे, या सर्वांनी आजच्या शिबिरातही रक्तदान केले. या सर्वांचा यावेळी उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाॅक्स
बल्लारपूर येथे आज रक्तदान शिबिर
बल्लारपूर येथे आज सकाळी १० ते २ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र, लॅपटाॅप बॅग देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी वसंत खेडेकर ९९२२९३०३५, मंगल जिवने ९९२२९३०१४९, राजेश खेडेकर ९९२२४१२५५४, किरण दुधे ९२२६७४७६२००, सुभाष भटवलकर ९६०४६५२४५० येथे संपर्क साधावा.
बाॅक्स
यांनी केले रक्तदान
वैद्यकीय क्षेत्र
डाॅ. कल्पना गुलवाडे, डाॅ. राजेश टाेंगे, डाॅ. सचिन बिलोने, डाॅ. अर्चना मुरके, डाॅ. कामना गुप्ता, डाॅ. अमित मुरके, डाॅ. प्रसाद पोटदुखे, डाॅ. एस. व्ही. रेगुंडवार, डाॅ. सात्विक गुंडावार, डाॅ. ऋतुजा मुंधडा, डाॅ. सौरभ राजुरकर, डाॅ. पल्लवी इंगोले, डाॅ. मनीष मुंधडा, डाॅ. प्रज्वल पालिवाल, डाॅ. अनुप पालिवाल, डाॅ. अजय वासाडे, डाॅ. मनीषा वासाडे, डाॅ. विश्वास झाडे, डाॅ. विजय गिरी, डाॅ. गोपाल राठी, डाॅ. प्राजक्ता अस्वार, डाॅ. उमेश उत्तरवार, डाॅ. राम भरत, डाॅ. प्रणय गांधी, डाॅ. कैलास मालू, डाॅ. किरण जानवे, डाॅ. इर्शाद शिवजी, डाॅ. सिद्धीकी शिवजी, डाॅ. अमित देवाजकर, डाॅ. अर्पणा देवईकर, डाॅ. पूनम नगराळे, डाॅ. नसरीन मावानी, डाॅ. मनोज भांडारकर, डाॅ. भालचंद्र भालके, डाॅ. सूरज कटपल्लीवार, डाॅ. प्रवीण पंत, डाॅ. राजेश वनकर, डाॅ. वर्षा गट्टाणी.
बाॅक्स
सामाजिक क्षेत्र
रूपेश ताजने, अरुण कलनकर, बंडू धोतरे, राजेश व्यास, यश बांगडे, आदर्श काळे, नरेंद्र लांजेवार, दिनेश करपे, सनित कहाळे, अर्शनंद रायपुरे, अशोक सूर्यवंशी, उमाकांत घोडेश्वार, सौरभ घोडेश्वार, पारितोष सरकार, राम ताम्हणे, हर्श मेश्राम, अतुल राखुंडे, पूजा चालखुरे, मंगेश करोकाटे, सुष्मा नगराळे, ॲड. सुरेंद्र बन्सोड, प्रा. डाॅ. राजश्री मार्कंडेवार, महेश काहिलकर, अजय मार्कंडेवार, विनोद गौरशेट्टीवार, निकेत गुरुनुले, वैभव वाकुडे, हितेश पाथ्रीकर, आशा उरकुडे, निखिल पाटील, नितीन मालवी, रौनव मावानी, मयूरी वैरागडे, संजय वैद्य, प्रदीप खांडरे, प्रवीण पाठक, विलास किन्नाके, जोत्स्ना इटनकर, मंदा पडवेकर, अश्वीन गोडबोले, विनोद बुले, संजय निंबाळकर, विनोद दत्तात्रय, माधुरी बुब्बावार, नायक कोपाकुमार, आर. क्रिष्णन, राजेंद्र वाढई, अब्दूल शेख.