बल्लारपूर व गोंडपिपरीतही लोकमतच्या रक्तमहायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:19 AM2021-07-04T04:19:43+5:302021-07-04T04:19:43+5:30

बल्लारपूरात लोकमतचे वतीने रक्तदान शिबिर रक्तदानातून बाबूजींना आदरांजली फोटो बल्लारपूर : लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल ...

Spontaneous response to Lokmat's blood sacrifice in Ballarpur and Gondpipri too | बल्लारपूर व गोंडपिपरीतही लोकमतच्या रक्तमहायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बल्लारपूर व गोंडपिपरीतही लोकमतच्या रक्तमहायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

बल्लारपूरात लोकमतचे वतीने रक्तदान शिबिर

रक्तदानातून बाबूजींना आदरांजली

फोटो

बल्लारपूर : लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाबूजींच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलै ते १८ जुलै या कालावधीत ‘लोकमत रक्ताचं नातं' अभियानांतर्गत ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी येथील ग्रामीण रुग्णालयात झालेल्या रक्तदान शिबिरात ३९ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. रक्तदात्यांना लॅपटॉप बॅग आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

लोकमत सखी मंचच्या संयोजिका किरण दुधे, सहसंयोजिका वीणा झाडे, सदस्य रेखा देशकर यांनी गायलेल्या ‘इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक उमेश पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गजानन मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक रजिम मुलानी, विकास गायकवाड, ठाकरे, कोठारीचे पोलीस निरीक्षक खुशाल चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कोरोना काळात निष्काळजीपणा लोकांना कसा महागात पडला, हे सांगत नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत हरीश शर्मा यांनी लोकमतच्या रक्‍ताचं नातं या उपक्रमाची प्रशंसा केली. डॉ. मेश्राम यांनी रक्तदानाचे आजच्या घडीला असलेले महत्त्व सांगितले. पाटील यांनी, रक्ताचे नाते सर्वांनी जपण्याचा आग्रह भाषणातून केला. प्रास्ताविक लोकमतचे तालुका प्रतिनिधी वसंत खेडेकर यांनी तर संचालन राजेश खेडेकर यांनी केले. आभार सुभाष भटवलकर यांनी मानले. बल्लारपूरचे लोकमतचे शहर प्रतिनिधी मंगल जीवने यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

बॉक्स

यांचे मिळाले सहकार्य

या रक्तदान शिबिराकरिता खैरे कुणबी समाज परिवार, बल्लारपूर लोकमत सखी मंच, बल्लारपूर युवक काँग्रेस, महात्मा ज्योतिबा फुले एनसीसी कॅडर, गुरुकुल कोचिंग क्लासेसचे सुनील ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे यांनी सहकार्य केले. तद्वतच, चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संकलन केंद्राचे कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बॉक्स

रक्तदात्यांची नावे

सुधीर कोरडे, उमेश काकळे, राजेश बट्टे, उत्तम तेलंग, आकाश चौधरी, विकास देशभ्रतार, प्राजक्ता पाटील, रणजित धोटे, मनीष जानके, विवेक पाटील, राहुल रामटेके, पिंटू वाढई, संजय कुबडे, रोहित कुमार आंबेकर, सुहास दुबे, अमित झुंगरे, चेतन शेंडे, शिवण नेमा, प्रभाकर जुमनाके, रमिज मुलानी, जयदीप मस्के, अक्षय भोजेकर, प्रकाश मडावी, सौरव कनकलवार, महिंद्र आलम, गोपाल टोंगे, लालबहादूर बहुरिया, अक्षय देशमुख, मुन्नालाल पुंडे, प्रशांत खोकले, विकास कल्लूरवार, रवींद्र मळावी, सुभाष भटवलकर, सचिन कोंडमलवार, गणेश ईजगिरवार, प्रफुल वांढरे, नागेश नान्हे, प्रमोद येरोला, अविनाश सिडाम.

Web Title: Spontaneous response to Lokmat's blood sacrifice in Ballarpur and Gondpipri too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.