अँटिजन तपासणीसाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:58+5:302021-05-25T04:31:58+5:30
फोटो मासळ (बु.) : कोरोनाच्या संसर्गाने सगळीकडे थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात शिरकाव केला. रुग्णसंख्या वाढत ...
फोटो
मासळ (बु.) : कोरोनाच्या संसर्गाने सगळीकडे थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात शिरकाव केला. रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना आजारावर वेळीच उपचार व्हावा म्हणून कोरोना रॅपिड अँटिजन तपासणीचे शिबिर शुक्रवारी मासळ बु. ग्रामपंचायतीच्या पटांगणात घेण्यात आले.
याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात रौद्र रूप धारण केले आहे. त्याचबरोबर शासनाने तिसऱ्या लाटेची पूर्वकल्पना प्रशासनाला दिली आहे. ग्रामीण भागातील परिसरातील गावांत पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाने अनेक रुग्ण दगावले. मासळ बु. गावातील कोरोना हद्दपार करण्यासाठी मजूर, कामगार इत्यादी लोकांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यासाठी विशेष करून महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. यावेळी मासळ ग्रामपंचायतचे सरपंच विकास धारणे, रॅपिड अँटिजन टेस्टिंग सेंटर चिमूरच्या टीमचे आरोग्य सेवक प्रदीप बन्सोड, रामेश्वर उताणे, आरोग्य सेविका गायत्री भानारकर, आशा वर्कर वनिता गणवीर, शालू बारेकर यांची यावेळी उपस्थिती होती.