बिबी येथील तालुकास्तरीय पशुप्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: March 28, 2017 12:32 AM2017-03-28T00:32:32+5:302017-03-28T00:32:32+5:30

पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समिती कोरपना यांच्यावतीने कोरपना तालुक्यातील बिबी येथे रविवारला तालुकास्तरीय पशुप्रदर्शनी पार पडली

Spontaneous response to taluka level animal husbandry in Bibi | बिबी येथील तालुकास्तरीय पशुप्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

बिबी येथील तालुकास्तरीय पशुप्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

विविध प्रजातीच्या पशू : विजेत्यांना बक्षिसाचे वितरण
ंकोरपना : पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समिती कोरपना यांच्यावतीने कोरपना तालुक्यातील बिबी येथे रविवारला तालुकास्तरीय पशुप्रदर्शनी पार पडली पशु प्रदर्शनीला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो पशूंनी सहभाग घेतला.
प्रदर्शनीचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती श्याम रणदिवे यांचे हस्ते पार पडले. तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे उपस्थित होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून जि.प. सदस्य कल्पना पेचे, विना मालेकर, पंचायत समिती सदस्य सविता काळे, रुपाली तोडासे, सहा. संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, बिबीचे सरपंच मंगलदास गेडाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, लखमापूरचे उपसरपंच मोरेश्वर आस्वले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत, रमेश पाटील मालेकर, ग्रामविकास अधिकारी अरुण वाकुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पाहुणे मंडळींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. संकरीत गाय वर्ग गटातून प्रथम क्रमांक भीमराव आंबोरे, द्वितीय क्रमांक सदाशिव थेरे, तृतीय क्रमांक विलास तडसे, देसी गावठी गाय वर्ग गटातून प्रथम क्रमांक मोरेश्वर आस्वले, द्वितीय क्रमांक कवडू चटप, तृतीय क्रमांक देवराव गिरडकर, संकरीत वासरे गटातून प्रथम क्रमांक संजू सातघरे, द्वितीय क्रमांक विकास धोंगळे, तृतीय क्रमांक दादाजी आस्वले, देसी गावठी वासरे गटातून प्रथम क्रमांक संतोष कोडापे, द्वितीय क्रमांक राजेंद्र देरकर, तृतीय क्रमांक अशोक हाके, म्हैस गटातून प्रथम क्रमांक तुळशीराम मोरे, द्वितीय क्रमांक पांडुरंग मोरे, तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर मोरे, बकरी गटातून प्रथम क्रमांक दीपक बोबडे, द्वितीय क्रमांक सोनेराव कुळमेथे, तृतीय क्रमांक महादेव पवार बोकड गटातून प्रथम क्रमांक साहिल शेख, द्वितीय क्रमांक शशिकांत देवकते, तृतीय क्रमांक किशोर आस्वले, कुक्कुट गटातून प्रथम क्रमांक पंकज जेऊरकर, द्वितीय क्रमांक अनिल महाजन व तृतीय क्रमांक सुरेश बल्लावार यांनी पटकाविला.
कार्यक्रमाचे संचालन पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. के. महाजन यांनी तर आभार डॉ. एस.एम. शेंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेकरिता कोरपना तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालय बिबी व तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Spontaneous response to taluka level animal husbandry in Bibi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.