स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:06+5:302021-08-27T04:31:06+5:30

चंद्रपूर : कोविडच्या प्रादुर्भावामुळे नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यामुळे अफवेला बळी न पडता स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे ...

Spontaneously come forward for eye donation | स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे

स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे

googlenewsNext

चंद्रपूर : कोविडच्या प्रादुर्भावामुळे नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यामुळे अफवेला बळी न पडता स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे व अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले. ३६ व्या नेत्रदान पंधरवड्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सरोदे, डॉ. पटेल, डॉ. वाघमारे, मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कर्मचारी तसेच नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी व रुग्ण उपस्थित होते.

नेत्रदान पंधरवड्याचा उद्देश सांगताना डॉ. दुधे म्हणाले की, बुबुळाच्या आजाराने अंध असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर एकच उपाय म्हणजे मृत व्यक्तीचे निरोगी बुबुळ प्रत्यारोपण करणे हा होय. दरवर्षी या रुग्णांमध्ये वाढ होत असते. याकरिता जास्तीत जास्त मरणोत्तर नेत्रदान करून बुबुळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर करणे आवश्यक आहे. तसेच व्यक्तींनी जिवंतपणी रक्तदान तर मरणोत्तर नेत्रदान करणे आवश्यक असल्याचेही डॉ. दुधे म्हणाले.

बाॅक्स

नेत्रदान करा नेत्रदान कोणालाही करता येते, नेत्रदान मृत्यूनंतर सहा तासांच्या आत करता येऊ शकते. कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आधी इच्छापत्र भरले नसेल तरीही नातेवाइकांच्या संमतीने नेत्रदान करता येते. याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा. तसेच डॉक्टरांची टीम येईपर्यंत रुग्णांच्या पापण्या झाकून ठेवाव्यात व डोळ्यावर थंड पाण्याचा कपडा ठेवावा, असे नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सरोदे यांनी सांगितले.

Web Title: Spontaneously come forward for eye donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.