चिंचोली आरोग्य केंद्रात रुग्णांशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:28 PM2019-03-27T22:28:01+5:302019-03-27T22:28:18+5:30

राजुरा तालुक्यातील चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. परिसरातील लोकांनी आणि रुग्ण कल्याण समितीने दवाखान्याला भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नसल्याचे समोर आले. सोबतच एकही कर्मचारी व परिचारिकाही दिसून आल्या नाहीत. त्यामुळे या केंद्रात केवळ रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे दिसून येते.

Sports with patients at Chincholi Health Center | चिंचोली आरोग्य केंद्रात रुग्णांशी खेळ

चिंचोली आरोग्य केंद्रात रुग्णांशी खेळ

Next
ठळक मुद्देरुग्णालयात वैद्यकीय अधिकारी गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्क
विरुर (स्टे.): राजुरा तालुक्यातील चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. परिसरातील लोकांनी आणि रुग्ण कल्याण समितीने दवाखान्याला भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नसल्याचे समोर आले. सोबतच एकही कर्मचारी व परिचारिकाही दिसून आल्या नाहीत. त्यामुळे या केंद्रात केवळ रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे दिसून येते.
सर्वात गंभीर बाब म्हणजे वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांना होती. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत पर्यायी डॉक्टराची व्यवस्था केली नाही. विशेष म्हणजे, त्यांचे राजुरा येथे खासगी रुग्णालय आहे. येथेच ते सर्वाधिक व्यस्त असतात, अशीही माहिती आहे. सदर चिंचोली प्राथमिक केंद्रावर जवळपास परिसरातील २२ गावे अवलंबून आहेत. परंतु वैद्यकीय अधिकारी मात्र एकच आहे आणि तेही आज आहे उद्या नाही, अशी परिस्थिती आहे. वारंवार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ओरड होत असतानाही याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे परिसरातील जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे.रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना ताटकळत रहावे लागते. त्यानंतरही वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात येत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागते. आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

चिंचोली आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत विचारले. त्यांनी बँकेतून पैशाची कपात केली असून त्याची चौकशी करण्यासाठी गेले असल्याचे सांगितले. पैसे वैयक्तिक आहे की शासकीय आहे, हे मला माहिती नाही.
- डॉ. अशोक जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी, राजुरा

मार्च एन्डींगचे अती महत्त्वाचे काम आहे. आणि उद्या मिटींगमध्ये माहिती द्यायची असल्यामुळे आज दिवसभर राजुरा येथे आलो आहे.
- डॉ. अभय मून, वैद्यकीय अधिकारी, प्राथ. आरोग्य केंद्र चिंचोली (बु.)

Web Title: Sports with patients at Chincholi Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.