राज्यभरातील कुस्तीच्या पहेलवानांना ताडोबाच्या राजाचे दर्शन

By साईनाथ कुचनकार | Published: April 11, 2023 06:05 PM2023-04-11T18:05:19+5:302023-04-11T18:07:10+5:30

खेळाडू व पालकांनी लुटला विनामूल्य टायगर सफारीचा आनंद

Sportsmen and parents from across the state enjoyed the free Tadoba Tiger Safari | राज्यभरातील कुस्तीच्या पहेलवानांना ताडोबाच्या राजाचे दर्शन

राज्यभरातील कुस्तीच्या पहेलवानांना ताडोबाच्या राजाचे दर्शन

googlenewsNext

चंद्रपूर : कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या पहेलवानांना ताडोबातील जंगलाच्या राजाचे दर्शन झाले. निमित्त होते ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्पात मोफत टाइगर सफारीचे. राज्यभरातून आलेल्या पहेलवानांना राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मोफत सफारी घडवून आणली.

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन मूल येथील तालुका क्रीडा संकुल येथे ८ ते १० एप्रिल या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्याच्या विविध भागातून खेळाडू सहभागी झाले होते. या सर्व खेळाडूंना व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांना जगप्रसिद्ध ताडोबा प्रकल्प बघण्याची संधी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली. ९ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात १३२ खेळाडू व पालक तर दुसऱ्या दिवशी १० एप्रिलला सकाळच्या सत्रात ५९ खेळाडू व पालकांनी ताडोबा येथे टायगर सफारीचा आनंद लुटला. या सफारीदरम्यान खेळाडू व पालकांनी टायगर फायटिंगसुद्धा अनुभवली.

या संपूर्ण नियोजनात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी जबाबदारी सांभाळली. यासाठी विशेष करून पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, स्वीय सहायक संतोष अतकरे, वनाधिकारी काळे सोयाम यांनी खेळाडू व त्यांच्या पालकांच्या ताडोबा सफारीचे नियोजन केले.

Web Title: Sportsmen and parents from across the state enjoyed the free Tadoba Tiger Safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.