झरण वनपरिक्षेत्रात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:47 PM2018-04-01T23:47:57+5:302018-04-01T23:47:57+5:30

एफडीसीएमच्या मध्य चांदा अंतर्गत येणाऱ्या बल्लारशाह वनप्रकल्पातील झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. १२३, १२४ मध्ये मागील दोन दिवसांपासून वणवा भडकला आहे. यात लाखोंच्या बांबूच्या रांझी व पाच सहा वर्षांपूर्वी रोपवन केलेले मौल्यवान सागाचे रोपटे जळून खाक झाले आहे.

Spread in the forest | झरण वनपरिक्षेत्रात वणवा

झरण वनपरिक्षेत्रात वणवा

Next
ठळक मुद्देलाखोंची वनसंपदा नष्ट : बांबूच्या रांझी व सागाची रोपटी जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर: एफडीसीएमच्या मध्य चांदा अंतर्गत येणाऱ्या बल्लारशाह वनप्रकल्पातील झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. १२३, १२४ मध्ये मागील दोन दिवसांपासून वणवा भडकला आहे. यात लाखोंच्या बांबूच्या रांझी व पाच सहा वर्षांपूर्वी रोपवन केलेले मौल्यवान सागाचे रोपटे जळून खाक झाले आहे. याशिवाय सरपटणारे प्राणी व इतर वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे वनविकास महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होवून महामंडळाला मोठा फटका बसला आहे. वनविकास महामंडळ अंतर्गत झरण वनपरिक्षेत्रात येणाºया कक्ष क्र. १२३, १२४ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागून जंगल जळत असताना आगीवर नियंत्रण मिळविण्यात वनकर्मचारी अपयशी ठरले आहेत. मागील दोन दिवसांपासून लागलेली आग जंगलात पसरत असतानाही वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्रधिकारी यापैकी कुणीही घटनास्थळी भेट दिलेली नाही, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. आगीने उग्ररुप धारण करीत बांबूच्या रांझी व साग प्रजातीचे मौल्यवान लहान झाडे आपल्या कवेत घेतले. त्यामुळे वनविकास महामंडळाची लाखो रुपयांची संपती जळून खाक झाली.
उल्लेखनीय असे, एफडीसीएमच्या याच क्षेत्रात वनप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वन्यप्राणीसुद्धा या आगीत होरपळून निघाले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आग विझविण्यासठाी विविध यंत्रणा असूनसुद्धा आगीवर अद्याप नियंत्रण मिळविले नाही. एफडीसीएमची यंत्रणा गेली कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वनकर्मचाºयाच्या दुर्लक्षतेमुळे दिवसेंदिवस आग लागल्याच्या घटना वाढत आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी याच वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ८१ मध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
जंगलातील आगीच्या घटना वाढताहेत
चंद्रपूर जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. जिल्ह्यातील विविध भागात घनदाट जंगल आहे. ताडोबासारखा मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून जंगलात आग लागल्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते. मोहर्ली, लोहारा, नागभीड तालुक्यातील शिवटेकडीमागील परिसर व इतर जंगलात आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. वणव्याचा हा प्रकार आणखी वाढू नये, यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचा भार प्रभारीवर
झरण वनपरिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांचे पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. धाबा येथील वनाधिकाऱ्यांकडेच झरण वनपरिक्षेत्राचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्या अनियमित येण्यामुळे वनकर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही.

Web Title: Spread in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.