शासकीय योजना प्रत्येकांपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:49 AM2018-01-24T01:49:16+5:302018-01-24T01:49:50+5:30
शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजना नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी तरुणांना पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सचिन बोढाले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आवारपूर : शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजना नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी तरुणांना पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सचिन बोढाले यांनी केले.
जिल्हा नेहरू युवा केंद्रामार्फत गुरुकुल महाविद्यालय नांदा येथे तालुकास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अनिल मुसळे, प्रा. संदीप खिरटकर, प्रा.बावणे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. खिरटकर म्हणाले, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हिरमसून न जाता बेरोजगरीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराची निवड करावी. स्वयंरोजगारासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्याचा लाभ घेऊन स्वयंरोजगार थाटावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना सामजिक समस्या, महिला सक्षमीकरण व सबलीकरण, शासकीय योजना, स्वयंरोजगार, सामाजिक दायित्व, समाजकार्य, यावर मार्गदर्शन केले. संचालन रुपाली पानघाटे, प्रास्ताविक तृष्णा पोतले, तर उपस्थिताचे आभार सचिन कनेर्वार यांनी मानले.