एसटीच्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:45 PM2018-02-20T23:45:55+5:302018-02-20T23:46:13+5:30
विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाता यावे, यासाठी मानव विकास बसफेरी सुरू करण्यात आली. या बसमध्ये शेकडो विद्यार्थिनी ये-जा करतात.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाता यावे, यासाठी मानव विकास बसफेरी सुरू करण्यात आली. या बसमध्ये शेकडो विद्यार्थिनी ये-जा करतात. मात्र सोयीसुविधांचा प्रचंड अभाव असल्यामुळे संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने एसटीमधील मूलभूत सुविधांमध्ये वाढ करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
एसटी महामंडळातर्फे मानविकास फेºयाअंतर्गत गावखेड्यांमध्ये बस पाठविली जाते. मुलींना शिक्षण घेता यावे, हा योजनेचा उद्देश आहे. परंतु बºयाचदा भंगार गाडी पाठविली जाते. बसला खिडक्या व काच नसतात. सीट फाटलेली असते. जुन्या गाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शासनाने एसटी महामंडळासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. यातील बराच निधी ग्रामीण भागातील मुलींच्या बस प्रवासासाठी खर्च केल्याचे शासनाकडून सांगण्यात येते. परंतु, बसेसची अवस्था अतिशय खराब असल्याने हा पैसा जातो कुठे, असा प्रश्न विद्यार्थिनींनी विचारला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात जाणाºया बसमध्ये सुविधांचा अभाव आहे. काही वाहन चालक बस थांबवित नाही. त्यामुळे विद्यार्थीनींची शाळा बुडत आहे.