धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:39 AM2019-08-13T00:39:06+5:302019-08-13T00:40:25+5:30

धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

ST reservation should be given to Dhangar community | धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे

धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
१९८७ या वर्षाच्या जनगनना विभाग पृष्ठ क्र.२९४ धनगर, धनगड जमात अनुसूचित जमातीत नोंदविण्यात आली आहे. १९७६ च्या मंडल आयोगाने धनगर, धनगड एकच असल्याचे मान्य केले आहे. १९८९ च्या सीएजी अहवालानुसार समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षणाचा लाभ देण्याची शिफारस केली आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजावर ७० वर्षांपासून अन्याय सुरू ुआहे. हा अन्याय दूर समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगर समाजाला अनुसूचित जातीत सामावून घेण्याची कार्यवाही करावी, यासाठी आॅगस्ट २०१८ ला मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. महाराष्ट्र धनगर समाज महासंघतर्फे जिल्हा अध्यक्ष योगीराज ठगे यांच्या नेतृत्वात ९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ चंद्रपूर उपाध्यक्ष गुलाब चिडे,मल्हार सेना जिल्हाध्यक्ष गौरव नवले, अहिल्या महिला संघ जिल्हाध्यक्ष पपीता येडे, रेखा मोढे, रमेश बुचे, नामदेव ढवळे, नंदकिशोर शेरकी आदींची उपस्थिती होती.

Web Title: ST reservation should be given to Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.