निम्मे प्रवासी घेऊन धावणार एसटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:44+5:302021-05-22T04:26:44+5:30
कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने १३ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे महामंडळाच्या बसफेऱ्या ...
कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने १३ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे महामंडळाच्या बसफेऱ्या तसेच खासगी वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली. यावेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तसेच अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी काही बसफेऱ्या सुरु होत्या. मात्र इतर प्रवशांना त्या बसमध्ये प्रवेश नसल्याने मोठी पंचायत होत होती. तसेच बसफेऱ्या बंद असल्याने महामंडळालाही मोठी फटका बसत होता. आता २० मे पासून आंतरजिल्हा व आंतरबाह्य प्रवासासाठी काही बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र या बस निम्मे प्रवासी घेऊन धावणार आहेत. एका सिटवर एका व्यक्तीलाच बसावे लागणार असून मास्क व सॅनिटायझर अनिवार्य आहे. बसमध्ये चढताना मास्क नसेल तर त्याला बसमध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याची माहिती, सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण नागपुरे यांनी दिली.
बॉक्स
असे आहे वेळापत्रक
चंद्रपूर बसस्थानकावरुन ब्रह्मपुरीसाठी सकाळी ८.३० वा, दुपारी १२, दुपारी २ वाजता, व्याहा (बु) दुपारी ३ वा, सायंकाळी ६ वा, गोंडपिपरी सकाळी १० वा, सायंकाळी ६ वा. राजुरा सकाळी ८ वा. १०, १२ वा, ४ वा, ८ वा. घुग्घुस सकाळी ८, १०, १२, ४, ६ वाजता, चिमूर सकाळी ७.३०, ९ वाजता, वरोरा सकाळी ११, १, ३, ५.४५ वाजता, भद्रावती २ वाजता, नागपूर सकाळी ८, दुपारी १२, ४ वाजता, गडचिरोली सकाळी १० वाजता बसफेऱ्या धावणार आहेत.
बॉक्स
आधार कार्ड अनिवार्य
प्रवाशांना बसमधून प्रवास करताना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर त्याची नोंद करण्यात येणार आहे. त्यानंतर तो अहवाल विभागीय कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. विभागीय कार्यालयातून तो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे. प्रवासी आपल्या स्थळावर उतरल्यानंतर त्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे.
कोट
गुरुवारपासून बसफेऱ्या धावत आहेत. ज्या मार्गावर प्रवासी संख्या जास्त असेल त्या मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात येतील. तर ज्या मार्गावर प्रवासी संख्या कमी असेल त्या मार्गावरील बसफेऱ्यांबाबत विचार करण्यात येईल. तिकिटदर पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. आधारकार्ड, मास्क व सॅनिटायझर असेल तर बसमध्ये प्रवेश दिला जाईल.
-किरण नागपुरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षकसहाय्यक वाहतूक निरीक्षक