मूल नगर परिषदेचे कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:39 AM2019-03-08T00:39:44+5:302019-03-08T00:40:31+5:30
येथील नगर परिषदमध्ये असलेल्या ६० कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल: येथील नगर परिषदमध्ये असलेल्या ६० कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार १८ कर्मचाऱ्यांना आस्थापनेवरील मंजुर व रिक्त पदावर या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्त कर्मचाऱ्यांना नगर परिषदेने ज्या दिनांकापासून रिक्त पदावर सामावून घेतले त्या दिनांकापासूनची सेवा सेवानिवृत्तीसाठी ग्राह्य धरली. त्यासोबतच रिक्त पदावर सामावून घेतल्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षांची सेवाज्येष्ठता पदोन्नती वेतनवाढ व इतर सेवा विषयक लाभासाठी अनुदेय राहणार नसल्याचे नमूद करण्यात आले. यासंदर्भात नगर परिषद कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने सदर कर्मचाºयांची सेवा नियमित करण्याबाबत कार्यवाहीकरण्याचा आदेश दिला. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. या साठ कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी कामबंद केल्याने अनेक कामांचा खेळखंडोबा झाला आहे. याकडे शासनाने लक्ष देवून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कामे खोळंबली
मूल नगर परिषदेअंतर्गत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे. अनेक अत्यावश्यक सेवेवरही परिणाम पडला. आंदोलन सुरू राहिल्यास प्रशासकीय कामे अडचणीत येतील. त्यामुळे ्रकर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.