रेल्वे अंडर पास मार्गात साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:11+5:302021-09-23T04:31:11+5:30
विसापूर : विसापूर हे गाव दोन विभागांत विभागले आहे. टेकडी व वस्तीतील नागरिकांना दैनंदिन गरजेसाठी अंडर पास भुयारी ...
विसापूर : विसापूर हे गाव दोन विभागांत विभागले आहे. टेकडी व वस्तीतील नागरिकांना दैनंदिन गरजेसाठी अंडर पास भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. या मार्गावर पाणी व रेती साचून असल्यामुळे नागरिकांना आवागमन करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मागील दोन वर्षांपासून रेल्वे फाटक बंद करण्यात आले तेव्हापासून नागरिकांना तिथे साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. शिवाय ग्राम प्रशासनाकडून तिथे स्वछता होत नसल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून त्यांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. गावाची लोकसंख्या १७ हजारच्या आसपास पाहता ओव्हर फूट ब्रीज होणे आवश्यक आहे. याबाबत ग्रामपंचायतीने अनेकदा निवेदन दिले; परंतु रेल्वे विभागाला जाग आली नाही. हजारो नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी या मार्गाने ये-जा करावी लागते. अंडर पास मार्ग खराब असल्याने बरेच नागरिक हे रेल्वे रूळ ओलांडून जात असतात. यामध्ये अनेक नागरिकांना रेल्वे अपघातामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करून तत्काळ अंडर पास मार्गाची दुरुस्ती करावी, तसेच पर्यायी मार्ग म्हणून ओव्हर फूट ब्रीज निर्माण करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
220921\img-20210919-wa0136.jpg
रेल्वे अंडर पास मार्गात साचले पाणी