आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी मानक कार्यपद्धतीचे पालन करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:38 AM2021-02-27T04:38:09+5:302021-02-27T04:38:09+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात व लगतच्या यवतमाळ, वर्धा, नागपूर व अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खाजगी बस ...

Standard procedures should be followed for inter-district and inter-district travel | आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी मानक कार्यपद्धतीचे पालन करावा

आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी मानक कार्यपद्धतीचे पालन करावा

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात व लगतच्या यवतमाळ, वर्धा, नागपूर व अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खाजगी बस वाहतुकदार, टॅक्सी व ऑटोरिक्षा संघटना यांच्यासाठी आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी मानक कार्यपद्धतीचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.

या मानक कार्यपद्धतीनुसार खाजगी प्रवासी बस ऑपरेटर व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांनी कोव्हीड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. मोटार वाहन नियमातील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने प्रवासाच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. आदी निर्देश दिले आहे. बसचे वाहन चालक व वाहक यांची आरटीपीसीआर चाचणी १५ दिवसांमध्ये किमान एकदा करुन परिवहन व पोलीस विभागाचे तपासणी अधिकाऱ्यांना मागणी केल्यानंतर दाखविण्यात यावे.

बाॅक्स

असे आहे नियम

प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करा, मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर व अतिरिक्त मास्क ठेवावे, प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, शरीराचे तापमान याबाबतचे अभिलेख ठेवा,वाहन चालक व वाहक यांची १५ दिवसांमध्ये एकदा आरटीपीसीआर चाचणी करा, नमुद आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूकीस मनाई

ऑटोरिक्षा ,टॅक्सीकरिता मानकपध्दती

मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना ऑटोरिक्षा/टॅक्सी/पर्यटक कॅब मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच वाहनामध्ये सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकिकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. ऑटोरिक्षा/टॅक्सी/पर्यटक कॅबमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांपैकी एखादया प्रवाशास ताप, सर्दी-खोकला इ. प्रकारची कोव्हीड १९ आजाराची लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना वाहनातून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा व याबाबत तात्काळ शासकिय यंत्रणेला रुग्णाची माहिती कळविण्यात यावे.

Web Title: Standard procedures should be followed for inter-district and inter-district travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.