चंद्रपूर-नागपूर इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करा
By admin | Published: November 9, 2016 02:07 AM2016-11-09T02:07:27+5:302016-11-09T02:07:27+5:30
चंद्रपूर-हिंगणघाट-नागपूर या मागार्ने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजाराच्या घरात आहे.
प्रवाशांची गैरसोय : व्यापारी, विद्यार्थ्यांसाठी होईल सुविधा
नागभीड : चंद्रपूर-हिंगणघाट-नागपूर या मागार्ने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजाराच्या घरात आहे. जलद गाड्यांना या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर येथून नागपूरकरिता बोटावर मोजण्याएवढ्या रेल्वे गाड्या आहेत. त्यातही रात्री रेल्वेगाडीचे वेळापत्रक नाही. नागपूर ते चंद्रपूरपर्यंत दररोज अप-डाऊन करणारे अनेक अधिकारी-कर्मचारी आहेत. रेल्वेगाडीअभावी त्यांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. हिंगणघाट, वरोरा, भद्रावती येथील प्रवाशांना मोजक्याच गाड्या आहे. अनेक वषार्पासून इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी वगार्तून होत आहे. त्याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बल्लारशाह, वर्धा, नागपूर या शहरादरम्यान इंटरसिटी रेल्वेगाडी सुरू करावी, अशीही मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली. या गाडीची सोय उपलब्ध झाल्यास पासधारक प्रवासी तसेच विद्यार्थी व व्यापारीवगार्ला मोठा दिलासा मिळेल.
इंटरसिटी एक्सप्रेसमुळे नागपूर ते चंद्रपूर दरम्यान ये-जा करणाऱ्यांना सुविधा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. या मार्गावर गाड्यांच्या फेऱ्या अधिक असल्या तरी काही गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची कोंडी होते. त्यामुळे अनेकजण बसगाडीने जाणे पसंत करतात. इंटरसिटी एक्सप्रेसमुळे हे प्रवासी रेल्वेकडे वळण्याची शक्यता आहे. बल्लारशाह, चंद्रपूर, वरोरा, हिंगणघाट, वर्धा येथून कार्यालयीन कामकाजाकरिता, शिक्षणाकरिता तसेच व्यावसायिक कारणानी दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. याशिवाय वर्धा किंवा नागपूर येथून पुढे रेल्वे प्रवास करण्याकरिता जाणारे प्रवासी असतात. त्यांनाही या रेल्वेगाडीमुळे सोईस्कर होईल. चंद्रपूर ते नागपूररम्यान इंटरसिटीसारख्या रेल्वेगाड्या सुरू केल्यास प्रवाशांना गंतव्यस्थळी वेळेवर पोहचण्यास मदत होईल. (तालुका प्रतिनिधी)
अनेक जलद गाड्यांना थांबाच नाही
चंद्रपूर, बल्लारशाह, हिंगणघाट या भागातील प्रवाशांना अमरावती, मुंबईकडे तसेच नागपूर, दिल्ली, कोलकाता या मार्गावर प्रवास करायचा असल्यास वर्धा किंवा नागपूरहून गाड्या बदलव्या लागतात. त्यांच्याकरिता इंटरसिटी गाडीने सुविधा होईल. या भागातील प्रवाशांकरिता रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने त्यांची बराच वेळ वाट पाहावी लागते.