करारनाम्यानंतरच बांधकाम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:41 PM2017-11-06T23:41:59+5:302017-11-06T23:42:18+5:30
तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे काम सुरू केल्याने शनिवारी ते बंद पाडण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा: तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे काम सुरू केल्याने शनिवारी ते बंद पाडण्यात आले होते. दरम्यान सोमवारी आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाºयांना घेराव घालून दोन दिवसांत करारनामा करा आणि त्यानंतरच बांधकामासाठी शेतात पाय ठेवा, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे.
नागरी येथील सबस्टेशनला वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतात टॉवर उभारले जात होते. मात्र, पॉवर ग्रीडने यासंदर्भात करारनामा केला नाही. प्रतिकार केल्यास शेतकºयांना दमदाटी केली जात होती. आज उपविभागीय कार्यालयात बैठक घेण्यात आली. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामूळे नागरी येथील उपकेंद्राचे काम बंद करण्यात आले. संतप्त शेतकºयांनी टॉवर कंपन्यांचा निषेध करून करारनामा करण्याची मागणी केली.
वर्धा ते नागरी येथे ४०० केव्ही टॉवर उभारली. शिवाय, नागरी ते परळी ७६५ केव्ही टॉवरची उभारणी केली जात आहे. वर्धा ते नागरी मार्गावरील शेतात टॉवर उभारणी करणाºया शेतकºयांना प्रति टॉवर १५ लाख रूपये तर नागरी परळी मार्गावरील टॉवरखाली आलेल्या शेताला २५ लाख रूपये प्रति टॉवर मोबइला द्यावा, टॉवर लाईनमुळे अशंत: बाधित झालेल्या शेतकºयांनाही मोबदला देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांनी केली. वरोरा येथील उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी आमदार बाळू धानोरकर, पॉवर ग्रीड कंपनीने अधिकारी, तहसीलदार सचिन गोसाई, कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थिीत होते. शेतकºयांचा वतीने आमदार बाळू धानोरकर यांनी भूिमका मांडली. शेतकºयांचे नुकसान होऊ नये, यासाठी पॉवर ग्रीड कंपनीच्या अधिकाºयांनी दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी आ.बाळू धानोरकर यांनी या बैठकीत केली.
-अन्यथा गुरूवारी आंदोलन
शेतकºयांशी करारनामा न करता टॉवर उभारल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावर मार्ग काढण्यासाठी उपविभागीय कार्यालयात बैठक पार पडली. मात्र, पॉवरग्रीड कंपनीने तोडगा काढला नाही. त्यामुळे गुरूवारी वरोरा येथील रत्नमाला चौकात रास्ता रोको आंदोलन आणि जाम तसेच नागरी येथील उपकेंद्रात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.