माढेळी येथे कापूस संकलन केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:06+5:302020-12-26T04:23:06+5:30
विलास नेरकर यांची राज्यमंत्र्यांकडे मागणी वरोरा : माढेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस पिकविला जाताम. त्यामुळे कापसासाठी हा ...
विलास नेरकर यांची राज्यमंत्र्यांकडे मागणी
वरोरा : माढेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस पिकविला जाताम. त्यामुळे कापसासाठी हा परिसरा प्रसिद्ध आहे. दोन जिनिंग आहेत. परंतु या ठिकाणी खरेदी केंद्र नसल्याने केंद्र मंजूर करण्याची मागणी राकाँचे विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर
यांनी राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वरोरा तहसीलवरून माढेळी हे गाव ३० किलोमीटर अंतरावर आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कापूस नेण्याकरिता त्रास होत आहे , ही अडचण दूर करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्याची माग राकाँचे विलास नेरकर यांनी केली. यावेळी किसान सेल अध्यक्ष विजय धंदरे , शहर अध्यक्ष राजु वरघने, युवक अध्यक्ष दिनेश मोहारे, उपाध्यक्ष अभिजित कुडे, महिला शहर अध्यक्ष सुनीता नरडे, ओबीसी सेल जिल्हा कार्यध्यक्ष बंडू डाखरे, विधानसभा उपाध्यक्ष बंडूजी खारकर, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष हसन डोसानी, प्रभाकर दारूनकर, गणपत भडगरे, रोशन भोयर, अमोल घोटेकर उपस्थित होते