चंद्रपूर शहरात मोफत धान्य वितरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:29 AM2021-05-19T04:29:15+5:302021-05-19T04:29:15+5:30
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. या लाॅकडाऊनमध्ये गरीब तसेच गरजू नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी राज्य शासनाने ...
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. या लाॅकडाऊनमध्ये गरीब तसेच गरजू नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी राज्य शासनाने अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थींना माेफत धान्य देण्याचा निर्णय घेतला, तर केंद्र सरकारनेसुद्धा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रतिलाभार्थी ५ किलो धान्य मोफत वितरणाचा निर्णय घेतला. या योजनेतील धान्य वितरणाचा शुभारंभ चंद्रपुरातील स्वस्त धान्य दुकानातून करण्यात आला.
चंद्रपूर शहरातील भाना पेठ वाॅर्ड व अंचलेश्वर वाॅर्ड येथील विद्याधर श्रीरामवार, अशोक वानखेडे तसेच पी.पी. देशमुख यांच्या रास्तभाव दुकानामध्ये निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे यांनी मोफत धान्य वितरणाचा शुभारंभ केला. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून लाभार्थींना धान्य वितरित करण्यात आले. दरम्यान, चंद्रपूर शहरातील अन्य रास्त भाव दुकानातूनही मोफत धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे.
बाॅक्स
या क्रमांकावर करा तक्रार
अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्याची मोफत उचल करावी. जे दुकानदार यासाठी पैशाची मागणी करीत असतील त्यांची १८००-२२- ४९५० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बाक्स
६० दुकानांत वितरण सुरू
चंद्रपूर शहरातील बहुतांश दुकानांतून या योजनेअंतर्गत अन्नधान्य वितरण सुरू करण्यात आले असून लाभार्थींना लाभ दिला जात आहे. अन्य दुकानांमधूनही येत्या एक ते दोन दिवसांमध्ये धान्य पोहचते होणार असून या दुकानांमधूनही धान्य वितरणाचा शुभारंभ होणार आहे.