गोंडवाना विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:29 AM2021-09-26T04:29:55+5:302021-09-26T04:29:55+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागातील झाडीपट्टीमध्ये तरुणांना नाट्य शाखेचा परिचय होईल आणि झाडीपट्टीची ओळख, रंगभूमीची ओळख संपूर्ण देशात व विदेशात ...
तालुक्यातील ग्रामीण भागातील झाडीपट्टीमध्ये तरुणांना नाट्य शाखेचा परिचय होईल आणि झाडीपट्टीची ओळख, रंगभूमीची ओळख संपूर्ण देशात व विदेशात झाडीपट्टीतील नाट्यशास्त्राचा अभ्यास करता येईल, या दृष्टिकोनातून प्रचार व प्रसार होईल. गोंडवाना विद्यापीठात नाट्यशास्त्र हा स्वतंत्र पदवी विभाग सुरू करून कला केंद्राची स्थापना करण्यात यावी, अशीही त्यांची मागणी आहे. नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांनी दिली. याप्रसंगी औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. सतीश पावडे, नागपूर विद्यापीठाचे डॉ. प्रमोद मुनघाटे, अनिरुद्ध वनकर, डॉ. श्याम मोहरकर, प्रा. सदानंद बोरकर, डॉ. बावनकुळे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे उपस्थित होते.
250921\screenshot_2021_0925_123655.jpg
गोंडवाना विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करा - प्रा.डॉ.शेखर डोंगरे