बचत गटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाची सुरुवात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:31 AM2019-07-28T00:31:53+5:302019-07-28T00:33:12+5:30

जिल्ह्यात बचत गटांमार्फत विषमता दूर करण्यासाठी बचत गटांच्या आर्थिक सत्याग्रहाला सुरुवात करा. त्यासाठी जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासातून कार्यप्रवण झालेल्या महिला बचत गटांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शनिवारी येथे केले.

Start financial consolidation through savings groups | बचत गटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाची सुरुवात करा

बचत गटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाची सुरुवात करा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार। बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या चवथ्या केंद्राचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : जिल्ह्यात बचत गटांमार्फत विषमता दूर करण्यासाठी बचत गटांच्या आर्थिक सत्याग्रहाला सुरुवात करा. त्यासाठी जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासातून कार्यप्रवण झालेल्या महिला बचत गटांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शनिवारी येथे केले.
महिलांमध्ये कौशल्य विकासाचे नवीन मॉडेल म्हणून उदयाला आलेल्या 'भाऊ' या बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या चवथ्या केंद्राचे मूल येथे त्यांनी आज लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मूल येथे जिल्ह्यातील चौथ्या बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिटच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी बॅचचा तिसऱ्या तुकडीला साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य वनसंरक्षक एस. वी. रामाराव, ताडोबाचे वनसंरक्षक एन.आर. प्रवीण, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पुष्पा डाहणे, संध्या गुरनुले, नंदू रणदिवे, नरेश उगेमुगे आदी उपस्थित होते.

बाजारपेठेसाठी केंद्राने प्रयत्न करावा
महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्ह्यामध्ये महिला बचत गटांना मोठया प्रमाणात कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी पुढे यावे. हवी ती मदत करू, अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. उपस्थित महिलांनादेखील त्यांनी आवाहन केले की, महिला बचत गटांच्या मार्फत आर्थिक विकास साधण्यासाठी त्यांनीदेखील एक पाऊल पुढे यावे, भाऊ हे चौथे युनिट जिल्ह्यांमध्ये सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यामार्फत बांबूपासून तयार होणाºया वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळावी व आपल्या वस्तू मोठया प्रमाणात बाजारात विकल्या जाव्यात. यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने बाजाराचा अभ्यास करणारी टीम तयार करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कृषी क्रांतीला सुरुवात होईल
चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठीदेखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. अनेक योजना दृष्टीपथात असून या नव्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. सोमनाथ येथे यावर्षीपासून कृषी विद्यापीठ सुरू होत असून या ठिकाणी आणि आपल्या भागातील शेतीचा संपूर्ण अभ्यास केला जाणार आहे. या ठिकाणच्या जमिनीची पोत, या ठिकाणी होणारी पिके या सर्वांचा अभ्यास केला जाईल व यामार्फत या भागातील कृषी क्रांतीला सुरूवात होईल, अशी अपेक्षा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

मूल रेल्वे स्थानक सजविणार
संपूर्ण भारतातील आकर्षक असे दोन रेल्वे स्टेशन म्हणून चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनचे नावलौकिक आहे. मात्र आता मूल रेल्वे स्थानकही भारतीय रेल्वेच्या आकर्षक रेल्वेस्थानकाच्या यादीत आले पाहिजे, असे निर्देश आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: Start financial consolidation through savings groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.