मूल तालुक्यात लहान मुलांसाठी कोविड वाॅर्ड सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:45+5:302021-06-16T04:37:45+5:30
शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांची मागणी मूल : कोरोनाची दुसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली असताना, लहान मुलांना धोका ...
शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांची मागणी
मूल : कोरोनाची दुसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली असताना, लहान मुलांना धोका असणारी तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. शासनाने सतर्कता म्हणून आतापासून तयारी सुरू केली आहे. मूल तालुक्यातील प्रमुख रुग्णालयासह कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी कोविड बालरुग्ण विभाग सुरू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. वेगाने केलेल्या चाचण्या, पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार आणि प्रभावी क्वारंटाईन यामुळेच रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी ना. सामंत यांना सांगितले. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सक्षम ठेवावी लागणार आहे. कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त लागण होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मूल तालुक्यात लहान मुलांसाठी कोविड वाॅर्ड सुरू करण्याची मागणी येरोजवार यांनी केली आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, उपतालुकाप्रमुख रवी शेरकी, सत्यनारायण अमरदिवार, सुशी दाबगाव सरपंच अनिल सोनुले, विनोद काळबांधे उपस्थित होते.