गेडामगुडा येथील शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:56 PM2018-01-08T22:56:48+5:302018-01-08T22:57:13+5:30

Start a school in Gedamguda | गेडामगुडा येथील शाळा सुरू करा

गेडामगुडा येथील शाळा सुरू करा

Next
ठळक मुद्देग्रामस्थ आक्रमक : 'पेसा' ग्रामसभेत ठराव

आशिष देरकर।
आॅनलाईन लोकमत
कोरपना : तालुक्यातील गेडामगुडा येथील एकमेव आयएसओ जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी बंद झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभा बोलावून शाळा सुरू करा, असा ठराव सवार्नुमते मंजूर करून करण्यात आला. सरपंच मंगलदास गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सोमवारी पार पडली. विशेष म्हणजे हे गाव 'पेसा' कायद्यांतर्गत येते.
कोरपना तालुक्यातील पाच जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या आहेत. त्यामध्ये गेडामगुडा येथील शाळेचाही समावेश आहे. बिबी ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या या शाळेच्या प्रगतीसाठी गावकºयांनी मोठे परिश्रम घेतले आहे. १० पेक्षा कमी पटसंख्या असल्याने ही शाळा बंद केल्याचे पाहून गावकरी हताश झाले आहेत. विद्यार्थ्यांचे इतर शाळेत कागदोपत्री स्थलांतरण केले असले, तरी येथील विद्यार्थी अन्य शाळेत जाण्यास तयार नसून पालकही पाल्यांना इतर शाळेत पाठविण्याच्या मनस्थितीत नाही. मंगळवारी माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देऊन गावकरी आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे कळते. या शाळेने आदर्श विद्यार्थी घडविण्यात मोलाची भूमिका बजावली. पालकांनी स्वत:ची शाळा समजून शाळेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. लोकसहभागातून शाळा घडली. शाळेच्या बाबतीत लोकांच्या भावना जुळलेल्या आहे. शाळेचा दर्जा उंचावला असून उत्तम वातावरण, गुणवत्ता व लोकसहभाग असताना शासनाने शाळा बंद करून पालकांवर मोठा आघात झाला आहे. त्यामुळे प्रशासनाविरुद्ध सर्व ग्रामस्थ एकवटले आहेत.
विद्यार्थी शाळाबाह्य
२७ डिसेंबरला शाळा बंदचे पत्र प्राप्त ग्रामस्थांना मिळाले. मात्र, विद्यार्थी या बंद शाळेतच बसत आहे. शाळा सुरू करण्यासाठी गावकरी एकवटले आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी तेरा दिवसांपासून शाळाबाह्य ठरल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Start a school in Gedamguda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.