शिक्षक भाषा विषय प्रशिक्षणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:37 PM2018-07-09T23:37:24+5:302018-07-09T23:37:41+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागीय मंडळ, नागपूरद्वारा उच्च माध्यमिक शिक्षक भाषा विषय प्रशिक्षणाला स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयाच्या श्री-लिला सभागृहात सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणात जिल्हाभरातील शिक्षक सहभागी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागीय मंडळ, नागपूरद्वारा उच्च माध्यमिक शिक्षक भाषा विषय प्रशिक्षणाला स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयाच्या श्री-लिला सभागृहात सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणात जिल्हाभरातील शिक्षक सहभागी झाले आहेत.
सदर प्रशिक्षण १३ जुलैपर्यंत चालणार आहे. यामधे इंग्रजी, मराठी व हिंदी या भाषा विषयाचे प्रशिक्षण होणार आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारा झाले. चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाला जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उप-प्राचार्य अशोक पोफळे, तज्ज्ञ मार्गदर्शक पि.डी. माहुरे, आर. डी. मालेकर, व्हि.एस. दुर्गे, उगेमुगे उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा होईल, असे मत प्राचार्य एम. सुभाष यांनी मांडले. यावेळी वर्ग बारावीच्या बदललेल्या परीक्षा पध्दतींवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. संचालन प्रा. गणेश सरकार यांनी केले.