माणिकगड परिसरात पर्यटन सफारी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:50 AM2021-02-18T04:50:34+5:302021-02-18T04:50:34+5:30
कोरपना : निसर्ग व वन संपदेने नटलेल्या माणिकगड परिसरात वन विभागाने पर्यटन सफारी सुरू करावी. तसेच येथील पर्यटनाला ...
कोरपना : निसर्ग व वन संपदेने नटलेल्या माणिकगड परिसरात वन विभागाने पर्यटन सफारी सुरू करावी. तसेच येथील पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.
चंद्रपूर येथून सुरू करून अमलनाला धरण, शंकरदेव देवस्थान, विष्णू मंदिर, माणिकगड किल्ला, शंकरलोधी गुफा, पकडीगुद्दम धरण, कारवाई गुफा आदी धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची भ्रमंती या पर्यटन सफारीत करता येऊ शकते. या माध्यमातून कोरपना व जिवती तालुक्यातील स्थळांना नवीन ओळख प्राप्त होईल. जिल्ह्यातील व अन्य ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येईल. यासाठी वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पर्यटन सफारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने येथेही पर्यटन सफारी सुरू केल्यास या भागातील लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होईल.