दुर्गापुरातून रुबेला-गोवर लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:31 PM2018-11-27T22:31:27+5:302018-11-27T22:31:44+5:30
जिल्ह्यातील एकही बालक गोवर रूबेला लसीकरणापासून वंचित राहू नये, याकरिता जिल्ह्यात मंगळवारपासून मोहीम सुरू करण्यात आली. दूर्गापूर येथील जनता विद्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील एकही बालक गोवर रूबेला लसीकरणापासून वंचित राहू नये, याकरिता जिल्ह्यात मंगळवारपासून मोहीम सुरू करण्यात आली. दूर्गापूर येथील जनता विद्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम, नागपूर येथील कुटुंब कल्याण विभागाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गोगुलवार, डॉ. मंगेश गुलवाडे, डब्ल्युएचओचे डॉ. श्रीधर, डॉ. शैलेश बागला, डॉ. तरपचंद भंडारी, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक सुर, डॉ.माधुरी मेश्राम, डॉ. अमित जयस्वाल आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण क्षेत्रातील ५ लाख २७ हजार ४५२ मुलामुलींना लसीकरण देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले.
गोवर रूबेला या घातक आजारापासून मुक्त्त करण्यासाठी जिल्हा मागे राहता कामा नये, याकरिता जिल्हा परिषदने विशेष नियोजन केले आहे. बालकांमध्ये लहान वयातच प्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणा हातात हात घालून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर यांनी २० राज्याांध्ये ही मोहीम राबविली जात असून जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करेल अशी ग्वाही दिली. यावेळी बालकांशी संवाद साधतांना त्यांनी तुम्ही लसीकरण केले. इंजेक्शन घेतले. ही माहिती आपल्या जवळच्या तीन मित्रांना देऊन त्यांनी लसीकरण करुन घेण्याची प्रेरणा द्यावी, असेही सांगितले शहरात महानगरपालिका तर जिल्ह्यात जिल्हा परिषद व ठिकठिकाणच्या नगरपालिकांमार्फत कार्यवाही केली जात आहे.
लसीकरणाला या विद्यालयातील चिमूकल्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. संचालन सुनीता पोटे यांनी केले.