कोरपन्यातील राज्य, राष्ट्रीय महामार्गाची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:00 AM2021-09-02T05:00:15+5:302021-09-02T05:00:15+5:30
राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गासह गडचांदूर - वणोजा - वणी, धानोरा - भोयगाव - गडचांदूर - जिवती, कोरपना ...
राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गासह गडचांदूर - वणोजा - वणी, धानोरा - भोयगाव - गडचांदूर - जिवती, कोरपना - वणी राज्य महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूकदार व नागरिकांना जाणे - येणे करणे कठीण होऊन बसले आहे. रात्रीच्या वेळी तर ही स्थिती अधिकच गंभीर होते. परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडाही दबल्या गेल्या आहेत. रस्त्यावरून वाहन खाली उतरले की, अपघाताला कारणीभूत ठरत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे. गडचांदूर ते भोयगाव मार्गाचे काम सुरू आहे. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे काम संपता संपत नाही. हीच स्थिती वनसडी - कवठाला - पौनी जिल्हा महामार्गाची आहे. त्यामुळे या कासवगतीने होणाऱ्या कामांना वेग देण्याची गरज व्यक्त होत आहे.
ग्रामीण रस्त्याची दुर्दशा
तालुक्यातील जेवरा - तुळशी, जांभूळधरा फाटा ते जांभूळधरा, शिवापूर - मांगलहिरा, कातलाबोडी - बोरगाव, पारडी - रुपापेठ, शेरज - धोपटाळा, कुसळ - कोरपना, रुपापेठ - उमरहिरा, कुसळ - बोरगाव, वरोडा - बाखडी, शेरज बु. - पिपरी, शेरज खु. - पिपरी, मांडवा - टांगाळा आदी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तसेच अनेक पांदन रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे.