ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांना राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:03+5:302021-04-04T04:29:03+5:30
मूल : तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांची शासनाकडून दिला जाणारा जिल्हा परिषद स्तरावरील अतिउत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी ...
मूल : तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांची शासनाकडून दिला जाणारा जिल्हा परिषद स्तरावरील अतिउत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली आहे.
जिल्हा परिषद स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा उत्साह वाढावा म्हणून शासन ग्रामसेवक संघटनेच्या मागणीनुसार मागील काही वर्षापासून आदर्श ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी पुरस्कार योजना राबवित आहे. या योजने अंतर्गत सन २०१९-२० मध्ये झालेल्या मूल्यमापनाच्या आधारे मूल तालुक्यतील मारोडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास बालाजी भोयर यांची शासनाच्या ग्रामविकास विभागाने चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड केली आहे.
ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांना २००९ मध्ये जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेवक म्हणून सन्मनित केले आहे. भोयर यांनी २७ वर्षाच्या सेवाकाळात राजुरा, पोंभुर्णा, गोंडपिपरी आणि मूल तालुक्यात कर्तव्य पार पाडले आहे. मागील चार वर्षांपासून मारोडा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवारत असताना २०१७ मध्ये मारोडा ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम अभियानाचा पुरस्कार मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.