संजय डोर्लीकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:25 PM2019-03-11T22:25:41+5:302019-03-11T22:26:02+5:30
शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पर्यवेक्षीय गटातून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पर्यवेक्षीय गटातून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शासनाकडून २०१८-१९ वर्षात नवोपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रम अंतर्गत शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी'लोकसहभागातून १०० टक्के माध्यमिक शाळा डिजिटल केल्या. त्यामुळे पर्यवेक्षीय अधिकारी गटातून डोर्लीकर हे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले.
शिक्षण परिषदचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्या हस्ते डोर्लीकर यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाळाबाह्य मुले दाखवा व मुख्याध्यापकांकडून एक हजार रूपये मिळवा' हा उपक्रमही त्यांनी यशस्वीरित्या राबविला होता.