चंद्रपुरात कुणबी समाजाचा राज्यस्तरीय परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:40 AM2020-12-14T04:40:22+5:302020-12-14T04:40:22+5:30
चंद्रपूर : कुणबी समाज मंडळ चंद्रपूरद्वारे आयोजित व विदर्भ मध्यवर्ती धनोजे कुणबी मंडळाद्वारे राज्यस्तरीय उपवर-उपवधू परिचय मेळावा आयोजित ...
चंद्रपूर : कुणबी समाज मंडळ चंद्रपूरद्वारे आयोजित व विदर्भ मध्यवर्ती धनोजे कुणबी मंडळाद्वारे राज्यस्तरीय उपवर-उपवधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा २५ ते २७ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी मंडळाद्वारे तयारी सुरु असून अधिकाधिक समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुणबी समाज मंडळातर्फे दरववर्षी भव्य स्वरुपात वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंडळाद्वारे ऑनलाईन मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यासंदर्भातील तयारीही सुरु करण्यात आली आहे. समाजबांधवांनी वर-वधुंची ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरावे लागणार आहे. या परिचय मेळाव्याला केवळ उपवर-उपवधू आणि त्यांच्यासोबत पालक प्रतिनिधीनांच उपस्थित राहता येणार आहे. लग्न जुळतांना येणाऱ्या अडचणीपासून समाजबांधवांना दिलासा मिळाला, एकाच जागेवर वधुवरांचा परिचय व्हावा यासाठी हा मेळावा घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कुणबी समाज चंद्रपूर या यु ट्यूब चॅनेलवर लाईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे. सहभागी सदस्यांना कोरोनामुळे नियमांचे पालन करून मास्कचा वापर करावा लागणार आहे. मेळाव्याचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुणबी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.