राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा -२०२०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:27 AM2020-12-22T04:27:11+5:302020-12-22T04:27:11+5:30
मेळाव्याचे उद्घाटन २५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता धनोजे कुणबी समाज भवन येथे होणार आहे. उद्घाटक म्हणून खासदार बाळू धानोरकर, ...
मेळाव्याचे उद्घाटन २५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता धनोजे कुणबी समाज भवन येथे होणार आहे. उद्घाटक म्हणून खासदार बाळू धानोरकर, अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते राहतील. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, पांडुरंग टोंगे, पवन राजूरकर, अनंत एकरे, दिनकर डोहे, रमेश राजूरकर, डॉ. पांडुरंग जरीले, अॅड. संतोष कुचनकर, मेघराज जोगी, मधुकर ढोके, उत्तमराव मोहितकर, समाधान धानोरकर, भरत पोतराजे, प्रभाकर मोरे आदींची उपस्थिती राहणार आहे.
या ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी सर्व समाजबांधव, उपवर-उपवधूंनी कुणबी समाज चंद्रपूर या यु-ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल ऑयकॉनला प्रेस करावे, असे आवाहन कुणबी समाज मंडळ, उपवर-वधू परिचय मेळावा आयोजन समिती चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------------
आदिवासी जमातींचा मेळावा
मूल : आदिवासी जमातींचा तीनदिवसीय उपवरवधू परिचय मेळावा २५, २६,आणि २७ डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याचे आभासी उद्घाटन सकाळी अकरा वाजता होणार आहे. उद्घाटन शहीद बाबूराव शेडमाके बहुउद्देशीय संस्था जानाळ्याचे अध्यक्ष राधाबाई सोयाम यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे अशोक येरमे, लक्ष्मण सोयाम, अरqवद मेश्राम ,बालस्वामी कुंभरे, अभिषेक पेंदाम, अशोक अलाम, किशोर उरकुंडवार, सुरेश जिल्हेवार यांची उपस्थिती राहणार आहे.