राज्यस्तरीय थ्रो-बॉल स्पर्धेचे भद्रावती येथे उद्घाटन

By admin | Published: November 11, 2016 12:59 AM2016-11-11T00:59:52+5:302016-11-11T00:59:52+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर,

State-level throw-ball tournament inaugurated at Bhadravati | राज्यस्तरीय थ्रो-बॉल स्पर्धेचे भद्रावती येथे उद्घाटन

राज्यस्तरीय थ्रो-बॉल स्पर्धेचे भद्रावती येथे उद्घाटन

Next

भद्रावती: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व चंद्रपूर जिल्हा थ्रोबॉल संघटनेच्या वतीने भद्रावती येथील तालुका क्रीडा संकुल मैदानावर राज्यस्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचे गुरूवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बाळू धानोरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, नागपूर विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, थ्रोबॉल अ‍ॅडहॉक कमिटी अध्यक्ष रजनी मुरारकर, एम. मुरारकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, जि.प. सदस्य विजय वानखेडे, तहसीलदार सचिन कुमावत, न.प. उपाध्यक्ष प्रफुल चटकी, डॉ. बी. प्रेमचंद, पंच प्रतिनिधी राहुल वाघमारे, थ्रोबॉल संघटनेचे सचिव डॉ. राकेश तिवारी, तालुका क्रीडा अधिकारी अभय महल्ले, अब्दुल मुस्ताक, कैलास माने, अंकुश डबाले आदी उपस्थित होते.
सुरूवातीला संध्या गुरुनुले यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. तत्पूर्वी खेळाडूंचे ध्वजसंचालन पार पडले. या स्पर्धेसाठी आठ विभागातील १४, १७, १९ वयोगटातील मुला व मुलींचे एकून ४८ संघ सहभागी झाले असून जवळपास ६०० खेळाडूंची उपस्थिती आहे.
उद्घाटना सामना १९ वर्षा खालील (मुले) लातुर व नागपूर संघात होवून नागपूर संघ विजयी झाला. १७ वर्षाखालील सामना कोल्हापूर-लातुर संघात होवून कोल्हापूर संघ विजयी झाला.
१४ वर्षाखालील सामना पुणे व मुंबई होवून मुंबई संघ विजयी झाला. मुलींच्या १९ वर्षाखालील सामन्यात कोल्हापूर ने नाशिक संघाचा तर १४ वर्षाखालील सामन्यात मुंबई संघाने पुणे संघाचा पराभव केला. कार्यक्रमाचे संचालन कातकर, मोंटू सिंग, प्रास्ताविक अनंत बोबडे तर आभार अब्दुल मुस्ताक यांनी मानले. ११ नोव्हेंबरला अंतिम सामने होणार असून राज्याचे संघही निवडले जाणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

चिमुकल्यांचे लेझीम
राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य आकर्षेण ठरले ते स्थानिक फेअरीलॅन्ड विद्यालयाच्या चिमूकल्यांच्या लेझीम पथकाचे. याप्रसंगी भारत माता की जय... ने परिसर दणाणून गेला. या लेझीम पथकात जवळपास १०० चिमुकल्यांचा सहभाग होता. या पथकाद्वारे सादर करण्यात आलेल्या लेझीममध्ये सुर, ताल आणि लय या तिनही गोष्टी होत्या.

Web Title: State-level throw-ball tournament inaugurated at Bhadravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.