मिश्र अध्यापन व अध्ययनावर राज्यस्तरीय वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:50+5:302021-07-10T04:19:50+5:30
श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, कोरपनाचे प्राचार्य डॉ. जोसेफ, ...
श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, कोरपनाचे प्राचार्य डॉ. जोसेफ, उपप्राचार्य डॉ. आर. आर. खेरानी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आयोजन करण्यात आले. या आभासी वेबिनारला संबोधित करताना प्रमुख मार्गदर्शक डॉ. डी.एन. मोरे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यू.जी.सी.ने उच्च शिक्षणात मिश्र अध्यापन व अध्ययन पद्धतीचा अंतर्भाव करण्यासंदर्भात जे पत्रक प्रकाशित केले, त्यावर सर्वत्र उमटलेल्या क्रिया-प्रतिक्रिया लक्षात घेता, येऊ घातलेल्या मिश्र अध्यापन व अध्ययन पद्धतीमुळे प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण, मोफत व समान शिक्षणाचा लोकशाहीने दिलेल्या मौलिक अधिकारापासून येणारी पिढी वंचित तर राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली. संचालन महाविद्यालयाच्या ग्रंथालय प्रमुख डॉ. साबळे यांनी केले. प्रास्ताविक अर्थशास्त्र विषयाचे प्रा. नागनाथ मनुरे यांनी केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विशाल मालेकार यांनी आभार मानले.