राज्यात एक कोटी लोकांची ग्रीन आर्मी तयार करणार - सुधीर मुनगंटीवार
By Admin | Published: June 22, 2017 01:37 PM2017-06-22T13:37:14+5:302017-06-22T15:22:29+5:30
ऑनलाइन लोकमत चंद्रपूर, दि. 22 - ग्रीन ऑर्गनायझेशनच्यावतीने पूर्व विदर्भात काढण्यात येणाऱ्या वृक्षदिंडीचा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते गुरुवारी ...
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 22 - ग्रीन ऑर्गनायझेशनच्यावतीने पूर्व विदर्भात काढण्यात येणाऱ्या वृक्षदिंडीचा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते गुरुवारी झाला. यंदा चार कोटी वृक्ष लागवड करणार आणि 2018मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड करणार व 2019 मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड करणार आहे, अशी माहिती यावेळी मुनगंटीवार यांनी दिली. यासाठी ग्रीन आर्मीचे मिशन राबविणार आहे.
यामध्ये एक कोटी सदस्य जोडणार आहेत. व सध्या ३१ लक्ष लोक जुळले आहेत. ही आर्मी वनांचे पर्यायाने पृथ्वीचे संवर्धन करणार, अशी घोषणा वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केली.
मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार अनिल सोले, आमदार नाना श्यामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूर नगराध्यक्ष हरिश शर्मा, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी व मान्यवर विराजमान होते.
https://www.dailymotion.com/video/x8455x6