सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:38+5:302021-09-04T04:33:38+5:30

चंद्रपूर : मोदी सरकारच्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टला विरोध करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या महिला अध्यक्षांच्या शिष्टमंडळाने ...

Statement to the Collector against the Central Vista Project | सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next

चंद्रपूर : मोदी सरकारच्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टला विरोध करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या महिला अध्यक्षांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मोदी सरकारतर्फे करोडाे रुपयांचा निधी खर्च करुन दिल्ली येथे केंद्रीय सचिवालय बांधण्यात आले. या इमारतीला सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट असे नाव देण्यात आले आहे. या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या महिला अध्यक्ष एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके, काँगेसच्या महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष ज्योती रंगारी, शिवसेनेच्या शहराध्यक्ष वर्षा कोठेकर, राष्ट्रवादीच्या प्रज्ञा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे, विधानसभा उपाध्यक्ष पूजा शेरकी, विधानसभा उपाध्यक्ष रश्मी झोटिंग, जिल्हा सचिव शोभा घरडे, सरस्वती गावंडे, नीलिमा नरवडे आदी उपस्थित होते.

Web Title: Statement to the Collector against the Central Vista Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.