जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:07+5:302021-08-25T04:33:07+5:30
कोविड मुक्त क्षेत्रातील (शहरी) शाळा सुरु कराव्या. सन २०२०-२१ मधील वेतनेतर अनुदान वितरित करण्यात यावे. सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांकरिता ...
कोविड मुक्त क्षेत्रातील (शहरी) शाळा सुरु कराव्या. सन २०२०-२१ मधील वेतनेतर अनुदान वितरित करण्यात यावे. सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांकरिता मास्क, हँडवॉश, ऑक्सिमीटर इत्यादी साहित्य शासनाकडून पुरवण्यात यावे. समग्र शिक्षा अभियानामधून वर्ग पाच ते आठच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात यावीत. पालकांनी विनंती करूनही टीसी न देणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात यावी. यासह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यावर शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हास्तरावरील सर्व समस्या तात्काळ निकाली काढल्या जाईल. शासन स्तरावरील असलेल्या समस्या शासनाकडे पाठविल्या जाईल, असे आश्वासन दिले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे, सचिव राजू साखरकर, कार्याध्यक्ष रमेशराव पायपरे, कोषाध्यक्ष राजू पारोधे उपस्थित होते.
240821\img-20210820-wa0157.jpg
चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोशिएशन तर्फे शिक्षण उपसंचालकांना शैक्षणिक समस्यांचे निवेदन