दिव्यांग संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:28 AM2021-09-25T04:28:51+5:302021-09-25T04:28:51+5:30
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती योजना लाभार्थ्यांचे मानधन दर महिन्याला नियमितपणे बॅंक खात्यात जमा करण्यात यावे, ...
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती योजना लाभार्थ्यांचे मानधन दर महिन्याला नियमितपणे बॅंक खात्यात जमा करण्यात यावे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मानधन हजार रुपयावरून तीन हजार रुपये करण्यात यावे, दिव्यांग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, दिव्यांग लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पहिले प्राधान्य देऊन घरकुल मंजूर करण्यात यावे, दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय यादीत समाविष्ट करण्यात यावे, गृहकरात पन्नास टक्के सवलत देण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष रफीक कुरेशी, सचिव अविशांत अलगमवार, संतोष सातपुते, विठ्ठल वासेकर, राजन गुरनुले, ताराबाई उराडे, भीमराव मानकर, प्रफुल्ल धोडरे, नवनाथ पिपरे, अनिल शेडमाके, शारदा मोगरकर उपस्थित होते.
240921\img-20210922-wa0013.jpg
दिवयांग संघटनेचे निवेदन देताना फोटो