शिक्षणाधिकारी यांना शैक्षणिक समस्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:25 AM2021-03-07T04:25:29+5:302021-03-07T04:25:29+5:30
विसापूर : चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोशिअएशनतर्फे शिक्षणाधिकारी माध्य. उल्हास नरड यांना शैक्षणिक समस्यांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. ...
विसापूर : चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोशिअएशनतर्फे शिक्षणाधिकारी माध्य. उल्हास नरड यांना शैक्षणिक समस्यांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर जिल्यातील माध्यमिक शाळातील प्रलंबित असलेल्या शैक्षणिक समस्या, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण तूर्त स्थगित करणे, वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना विनाअट मंजूर करणे, तसेच कडक उन्हाळा सुरू झाल्यामुळे माध्यमिक शाळा सकाळ पाळीत घेण्याची परवानगी देण्याबाबत व इतर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली, यावेळी शिक्षणाधिकारी नरड यांनी निवेदनातील समस्या तात्काळ निकाली काढल्या जाईल, असे सांगितले, यावेळी चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोशिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे, सचिव राजू साखरकर, सल्लागार स्मिता ठाकरे, सहसचिव मनोज पावडे, सहकोषाध्यक्ष छाया मोहितकर, सदस्य अनिता पंधरे, रमा वाघमारे, हेमराज नदेश्वर, उमेश पंधरे इत्यादी उपस्थित होते,