गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:10+5:302021-02-07T04:26:10+5:30
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांच्या पूर्तेतेसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांची भेट ...
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांच्या पूर्तेतेसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली.
ना. उदय सावंत हे गोंडवाना विद्यापीठ संलग्न डेटा सेंटर मॉडेल कॉलेजच्या भूमिपूजनासाठी गडचिरोली येथे आले होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष निलेश काळे, महादेव वासेकर व सतीश पडोळे यांनी त्यांची भेट घेतली. गोंडवाना विद्यापीठाच्या एक स्तर वेतनश्रेणीबाबत ५८ महिन्यांची थकबाकी व अतिरक्त घरभाडे कपातीबाबत व इतर महत्त्वाच्या समस्यांबाबत निलेश काळे यांनी प्रखरपणे भूमिका मांडली. त्यावर ना. सावंत यांनी अतिरिक्त घरभाडे कपात करण्यात येऊ नये. ते फेब्रुवारीपर्यंत चालू ठेवण्यात यावे, असे स्पष्ट आदेश सहसंचालक, नागपूर विभाग यांना दिले. कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएसचा प्रश्न एका महिन्याच्या आत मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले. यावेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.