प्रवासी वाहन-चालक-मालक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:29 AM2021-05-07T04:29:51+5:302021-05-07T04:29:51+5:30
मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन होता. डिसेंबर-जानेवारीमध्ये सूट देण्यात आली. परंतु, पुन्हा मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्व ...
मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन होता. डिसेंबर-जानेवारीमध्ये सूट देण्यात आली. परंतु, पुन्हा मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्व पर्यटनस्थळे, मंदिर, यात्रा, लग्न, शाळा, कॉलेज बंद आहेत. याचा परिणाम टुरिस्ट टॅक्सी, व्यावसायिक प्रवासी वाहन व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे वाहनांवरील कर्ज, इन्शुरन्स, रोड टॅक्स कसे भरायचे, असा प्रश्न आहे. त्यामुळे वाहनांवरील कर्जाचे हप्ते हे किमान सहा महिन्यांसाठी विनाव्याज पुढे ढकलावे. बँकांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, अशा सूचना द्याव्या. नूतनीकरण केलेले इन्शुरन्स व्यवसाय पूर्ववत सुरू होईपर्यंत वाढ द्यावी. व्यावसायिक प्रवासी वाहनांचे टॅक्स कॅरी फाॅरवर्ड करावे. व्यावसायिक प्रवासी वाहन-चालक-मालकांना दरमहा १० हजार रुपये देण्यात यावे. अन्यथा, व्यावसायिक रस्त्यावर उतरून सर्व वाहने प्रत्येक जिल्हा परिषद कार्यालयात उभे करण्यात येतील, असा इशारा निवेदनातून दिला. यावेळी प्रवीण चिमूरकर, आशीष कार्लेकर, दिनेश शर्मा, रतन सुकारे, हरिदास खोब्रागडे, किरण बावणे, निलेश कुटेमाटे, गुलाब बेलेकर आदी उपस्थित होते.