बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचे शल्य चिकित्सकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:29 AM2021-05-11T04:29:30+5:302021-05-11T04:29:30+5:30
बल्लारपूर : स्थानिक आम आदमी पक्षाच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयातील समस्यांच्या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांना निवेदन ...
बल्लारपूर : स्थानिक आम आदमी पक्षाच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयातील समस्यांच्या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. बल्लारपूर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात आलेल्या रुग्णाला साधारण आजार असला तरी रुग्णांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात येते. उलटी हगवणच्या रुग्णांनाही ग्लुकोज लावून चंद्रपूर रुग्णालयात पाठविण्यात येते. यामुळे अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांना त्रास होत आहे. कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात बेडची कमतरता असताना व बल्लारपूर रुग्णालयातील बेड खाली पडून असताना डॉक्टर मंडळी आपली जबाबदारी झटकून रुग्णांना चंद्रपूरला पाठवित आहे. असला प्रकार थांबवावा, अशी मागणी आप पक्षाचे संयोजक रवी पुप्पलवार, उपाध्यक्ष सय्यद अफजल अली, आसिफ हुसेन शेख, समशेरसिंग चौहान, सय्यद अजहर अली यांनी केली आहे. यावेळी जिल्हा चिकित्सक राठोड यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.