विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत तनपुरे यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:29+5:302021-06-05T04:21:29+5:30
ना. प्राजक्त तनपुरे हे कोरोना संसर्गावरील उपायात्मक कामाचा आढावा घेण्याकरिता येथे आले होते. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी त्यांची त्याप्रसंगी भेट घेतली. ...
ना. प्राजक्त तनपुरे हे कोरोना संसर्गावरील उपायात्मक कामाचा आढावा घेण्याकरिता येथे आले होते. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी त्यांची त्याप्रसंगी भेट घेतली. दहावी तसेच बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता जमा केलेली फीची रक्कम त्यांना परत मिळावी, अकरावी तसेच पदवीच्या वर्गात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे निकष कोणते, ते स्पष्ट करावेत. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांकडून केवळ ट्यूशन फी घ्यावी, इतर फी आकारू नये, या व इतर अनेक मागण्यांचा समावेश या निवेदनात आहे. राज्य सरकारने या मागण्या पूर्ण न केल्यास भाजप युवा मोर्चाचे वतीने आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदन देताना भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे संयोजक प्रतीक भारसाकडे, आदित्य शिंगरडे, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.