विविध समस्यांसाठी वेकोलिला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:33+5:302021-09-07T04:33:33+5:30
पाटाळा येथील विविध समस्या आणि विकास कामे, ज्यात मुख्यत्वे गावातील खुल्या जागेचे साैंदर्यीकरण, पांदण रस्ते तयार करण्यासाठी मुरुम देणे ...
पाटाळा येथील विविध समस्या आणि विकास कामे, ज्यात मुख्यत्वे गावातील खुल्या जागेचे साैंदर्यीकरण, पांदण रस्ते तयार करण्यासाठी मुरुम देणे आणि कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार देणे, याविषयी चर्चा करण्यात आली. पाटाळा हे गाव दत्तक गाव आहे. पर्यावरण व इतर समस्यांची झळ गावकरी सोसतात. गावातील पांदण रस्त्याची मुख्य समस्या आहे. त्यात जर खाणीतून निघणारा मुरुम जर रस्त्यासाठी दिली, तर कमी पैशात रस्त्याची समस्या दूर होऊ शकते. हा विषय उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या अखत्यारित असल्याने, त्यांचा आदेश मिळाल्यास मुरुम पांदण रस्त्याला देण्याचे मान्य केले.
यावेळी नीलेश झट्टे, पांडुरंग आगलावे, विवेक कळसकर, तुषार धोबे, शंकर पोटे, चंद्रशेखर खिरटकर, सुमित पोटे, कुंदन गौरकर, आदित्य आगलावे, विवेक मिलमिले आदी उपस्थित होते.
060921\img-20210905-wa0063.jpg
निवेदन देताना पाटाळा ग्रामवासी