मनपाच्या अग्निशमन दलाचे स्टेअरिंग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:33+5:302021-03-04T04:53:33+5:30
चंद्रपूर : नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊनही येथील अग्निशमन दल विभागात अद्यापही स्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. परिणामी कंत्राटी ...
चंद्रपूर : नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊनही येथील अग्निशमन दल विभागात अद्यापही स्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. परिणामी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर मनपा अग्निशमन विभागाची धुरा आहे. त्यामुळे कुठेही मोठी आग लागल्यास या कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडते.
मागील आठवड्यात चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला आग लागली होती. उन्हाळ्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. चंद्रपूर येथे नगरपरिषद असल्यापासून अग्निशमन विभाग कार्यरत आहे. नगर परिषदेचे रूपांतर मनपामध्ये झाल्यानंतरही येथील अग्निशमन विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची भरणा करण्यात आली नाही. केवळ ३० च्या जवळपास कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यातही तज्ज्ञ कर्मचारी नाही. सन २०१३ च्या आकृतिबंध ९६ पदांचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर ५३ पदे वाढवून १४९ पदांचा आकृतिबंध पाठविण्यात आला. मात्र, दोन्ही प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळाली नाही. परिणामी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच अग्निशमन विभागाचा कारभार सुरू आहे.
बॉक्स
प्रस्तावात पाठविलेली पदे
मुख्य अग्निशमन अधिकारी १
उपमुख्य अग्निशमन अधिकारी १
विभागीय अग्निशमन अधिकारी
सहायक विभागीय अधिकारी १
अग्निशमन केंद्र अधिकारी १
सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी ३
उप अग्निशमन अधिकारी ४
प्रमुख अग्निशमन विमोचक ५
चालक यंत्रचालक २०
वाहनचालक अग्निशमन ३५
अग्निशमन विमोचक फायरमन ७५
कोट
स्थायी कर्मचाऱ्यांसंदर्भात भरतीचा प्रस्ताव पाठविला आहे. तो प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. सद्य:स्थितीत ३० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. नियमित फायर ऑफिसरचे पद रिक्त असल्याने तांत्रिक अडचणी जाणवत असतात.
विशाल वाघ, उपायुक्त मनपा, चंद्रपूर
बॉक्स
- जिल्हा नियोजन समितीतून निधी
मनपा अग्निशमन दलाला जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचवेळी महापालिकेच्या करामध्ये वसूल केलेल्या अग्निशमन कर आणि नाहरकत प्रमाणपत्रासाठी आकारलेल्या शुल्कातून निधी उपलब्ध होता.
बॉक्स
दोनदा पाठविला प्रस्ताव
-मनपा अग्निशमन विभागातील ९६ पदांच्या आकृतिबंधाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर ५३ पदांची वाढ करून १४९ पदांचा सुधारित आकृतिबंध पाठविण्यात आला. मात्र, अद्यापही त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत कार्यरत ३० कंत्राटी कर्मचारी विभागाचा डोलारा सांभाळत आहेत.
-उन्हाळ्यांमध्ये आगीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, अपुरे मनुष्यबळ व स्थायी कर्मचाऱ्यांअभावी मोठी तारांबळ उडत असते.