स्टेअरिंग आता महिलांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:55 PM2019-08-05T22:55:31+5:302019-08-05T22:55:46+5:30

एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून आॅगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या महिला सेवेत दाखल होतील. त्यामुळे एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती जाणार आहे.

Steering is now in the hands of women | स्टेअरिंग आता महिलांच्या हाती

स्टेअरिंग आता महिलांच्या हाती

Next
ठळक मुद्देप्रशिक्षणाला सुरुवात : १५० महिला चालकांची भरती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून आॅगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या महिला सेवेत दाखल होतील. त्यामुळे एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती जाणार आहे.
सध्या एसटी महामंडळाची भरती प्रक्रिया सुरू आहे. यात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त महिलांचा प्रतिसाद मिळावा यासाठी काही अटींमध्ये बदलही करण्यात आले आहेत. पुरुष व महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव अशी अट यापूर्वी होती. मात्र ही अट शिथील करून महिलांसाठी अवजडऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षाचा परवाना अशी अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार महिलांनी अर्ज केले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चालक-वाहक पदासाठी १५० महिला पात्र ठरल्या आहेत. अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्या सेवेत दाखल होतील. या महिला चालकांना प्रथम कमी अंतरावरील एसटी चालवण्याचा अनुभव देण्यात येणार आहे. त्यानंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्यामुळे महिलांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
महिला चालकांसाठी अबोली रंगाची रिक्षा
परिवहन विभागामार्फत रिक्षा आणि टॅक्सीसाठी देण्यात येणारे परवाने मुक्त करण्यात येऊन मागील पाच वर्षात सुमारे दोन लाख ४० हजार परवाने देण्यात आले. हे परवाने देताना महिलांचाही विचार करण्यात आला. महिला रिक्षा चालकांना ‘अबोली’ रंगाच्या रिक्षा देण्यात येतात. आतापर्यंत एक हजार १०८ इतक्या रिक्षा महिला चालकांना देण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे आदी शहरामध्ये महिला चालक या रिक्षा चालविताना दिसत आहेत.

Web Title: Steering is now in the hands of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.