रस्त्यावरील दुर्गंधीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:55+5:302021-02-27T04:37:55+5:30
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी चंदपूर : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरूस्ती केली जात नाही. ...
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
चंदपूर : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरूस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रानडुकरांचा बंदोबस्त करावा
चंद्रपूर : शहरातील काही भागामध्ये डुकरे मोकाट फिरत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सौरदिव्यांची दुरुस्ती करावी
जिवती: तालुक्यातील अनेक गावांत सौरदिवे लावण्यात आले. परंतु, अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. रात्री अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सौरदिवे दुरुस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
सिमेंटीकरणाची नागरिकांची मागणी
चंद्रपूर : येथील तुळशीनगर, वृंदावननगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून येथील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.